वुहानमध्ये कोरोनाचे 13 प्रकार – WHO

97

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमधील वुहान शहरात कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसाराची कारणे शोधण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पथकाने आपल्या प्राथमिक अंदाजात अतिशय धक्कादायक खुलासे केले आहेत. वुहानमध्ये कोरोनाचे 13 प्रकार आढळून आले असून प्राथमिक अंदाजापेक्षा 500 टक्क्यांहून अधिक विध्वंस झाल्याचा दावा WHO ने केला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार वुहान शहरातून झाला. तब्बल एका वर्षानंतर WHO च्या तज्ज्ञांच्या पथकाला चीनने तपासणीची परवानगी दिली. रिसर्चर पिटर इमरबॅक यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यानंतर कोरोना संसर्ग आणि प्रसाराबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या प्रकारावरही या तज्ज्ञांच्या पथकाने अभ्यास केला.

पीटर यांनी कोरोनाच्या जनेकिटक्स बद्दलही संशोधन केले आहे. वुहानमध्ये डिसेंबरमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसचे तब्बल 13 विविध जनेटिक सिक्वेन्स दिसल्याचे पीटर यांनी सांगितले. याचाच अर्थ डिसेंबमध्येच कोरोनाचे वेगवेगळे 13 प्रकार समोर आले होते. डिसेंबर महिन्यात वुहान शहरात कोरोनाचे एक हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 17 नोव्हेंबर 2019 रोजी आढळला होता. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण होते, अशी माहिती यूनिवर्सिटी ऑफ सिडनीचे व्हायरॉलॉजिस्ट एडवर्ड होम्स यांनी दिली. दरम्यान कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याचे सर्व दावे चीनने फेटाळले आहेत. मिलान कॅन्सर इन्टिट्यूटप्रमाणे कोरोनाचा प्रसार ऑक्टोबर 2019 मध्ये झाला. ऑक्टोबर महिन्यात इटलीमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याचा अंदाज या इन्स्टिट्यूटने व्यक्त केला आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरास WHO परवानगी दिली आहे. जगभरात आता सीरमच्या लसीचा वापर हा केला जाणार आहे. आता ही कोरोना लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाणार आहे.

संदर्भ व अधिक माहिती – पोलिसनामा