आदिवासी जनाधार संस्थेकडून मदतीचा हात

76

तलासरी (ठाणे) – सध्या चालू असलेल्या जागतिक कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच प्रमाणात वित्तहानी झाली, अनेकांचे रोजगार गेले. हाताला काम नसल्याने जगायचे कसे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन सर्वोतोपरी ऑनलाईन शिक्षण, एफएम रेडीओ वाटप, दूरदर्शनवर शैक्षणिक अभ्यासक्रम दाखवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करत आहे. त्यासोबतच विविध सेवाभावी संस्था यात खारीचा वाट उचलत आहे.

त्यातील एक तलासरी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जनाधार संस्थेकडून परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच इतर काही शैक्षणिक उपक्रम घेतले जात आहे. त्यासाठी संस्थेने शालेय साहित्य उदा. वह्या, पुस्तके, पेन, इत्यादी तसेच इतर मदतीचे आवाहन केले आहे. स्वखुशीने कुणी विद्यार्थ्यांना मदत म्हणून पुढे येत असेल तर संस्थेकडून त्यांचे स्वागतच आहे.

मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. – 8698259938/8805330043/8806084188/8805500561