भारताच्या गोलंदाजांचा धुव्वा, सेमी फायनमध्ये लाजिरवाणा पराभव.

20

जोस बटलरच्या इंग्लंड संघानं टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात भारताच्या स्वप्नांचा धुव्वा केला. तब्बल 15 वर्षांनी टी20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानं ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. तर इंग्लंडनं 2016 नंतर पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्याचा बचाव करण्यात टीम इंडियाचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.

अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीसह इतर गोलंदाजांना या सामन्यात जराही कमाल दाखवता आली नाही. एकही विकेट भारताच्या नवीन तसेच अनुभवी गोलंदाजांना घेता आली नाही. जागतिक स्पर्धेत उत्तम समजला जाणारा भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप महत्वाच्या सामन्यात फेल ठरला. तर भुवनेश्वर कुमार आणि शमीलाही हेल्स आणि बटलरला रोखता आलं नाही. रोहित शर्माच्या या महत्वाच्या शिलेदारांनी निर्णायक सामन्यात निराशा केल्यानं भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली.

मेलबर्नमध्ये रविवार १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघात यंदाच्या वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे.