News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. भुजबळांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केल्यानंतर त्यांना कारावासही भोगावा लागला होता.

भुजबळांच्या वरील याचिकेवर ‘ईडी’ला २६ जुलैपर्यंत लेखी खुलासा सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.