‘गुलाब’ मुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

48

नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झालं आहे. चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. उद्या संध्याकाळी 26 तारखेला ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.