मुंबई – केंद्रशासनाच्या वतीने वर्ष २०२३ साठी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना घोषित झालेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार १२ जुलै या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी मुंबई येथील निवासस्थानी जाऊन उस्ताद झाकीर हुसेन यांना हा पुरस्कार प्रदान केला. (Zakir Hussain awarded ‘Padma Vibhushan’!)
उस्ताद झाकीर हुसेन यांनी ‘कलेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र आणि देशाची सेवा केली. याची नोंद घेतली याविषयी मी कृतज्ञ आहे’, अशी भावना व्यक्त केली. या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर उपस्थित होते.