ज्योतिर्लिंगांची स्थाने आणि महत्त्व

3

भारतातील प्रमुख शिवस्थाने म्हणजे ज्योतिर्लिंगे बारा आहेत.

ज्योतिर्लिंगे (छायाचित्र संदर्भ – सनातन संस्था)

१. श्री सोमनाथ, प्रभासपट्टण, वेरावळजवळ, सौराष्ट्र, गुजरात – पुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला तेव्हा याच ठिकाणी चंद्राने शिवाची पूजा केली आणि शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. या ठिकाणी स्वतः चंद्रदेवांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

२. श्री मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्रप्रदेश – आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर स्थित आहे. आंध्र प्रदेशात असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असे आहे. भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा लावले त्याचे प्रथम लग्न लावण्यात येईल. हे ऐकून कार्तिकेय प्रदक्षिणा घालू लागला परंतु गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली आणि त्यांना पृथ्वीसारखे असल्याचे सांगितले. जेव्हा कार्तिकेयला ही बातमी कळली तेव्हा तो संतापला आणि क्रंच डोंगरावर गेला. जेव्हा त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा पार्वती देवी त्यांना आणण्यासाठी गेल्या परंतु त्यांना पाहून ते तिथून पळून गेले. यामुळे निराश होऊन पार्वती तिथे बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगत झाले. हे ठिकाण मल्लिकार्जुन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. (संदर्भ – marathi.webduniya .com)

३. श्री महाकालेश्वर, उज्जैन, मध्यप्रदेश – शिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधण्यास सांगितले. ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना. दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडेबरा ना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले. यावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले. हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.

४. श्री ओंकारेश्वर, ओंकार, मांधाता, मध्यप्रदेश – महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशिवाय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेले आहे. भाविकांनी इतर तीर्थक्षेत्रातून पाणी आणून ओंकारेश्वर बाबांना अर्पण केल्यास त्यांची सर्व तीर्थे पूर्ण होतात, असा समज आहे.

५. श्री केदारनाथ, हिमालय – केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक आहे, जेथे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेले आहे. हे भगवान शंकराचे घर मानले जाते.

६. श्री भीमाशंकर, खेड, पुणे, महाराष्ट्र – पुण्यापासून सुमारे 115 किलोमीटर अंतरावर एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भीमा नदीच्या उगमस्थानी शिरधान गावात वसलेले हे मंदिर शिवलिंगाच्या जाडीमुळे मोतेश्वर महादेव म्हणूनही ओळखले जाते. महाराज छत्रपती शिवाजी राजे येथे पुजा करण्यासाठी अनेकदा येत असत. कुंभकर्णाचा वध झाल्यावर अनेक वर्षांनी त्याचा मुलगा भीम वडलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जंगलात जाऊन ब्रह्मदेवाची कठीण तपश्चर्या केली. भीमाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाने त्याला अत्यंत शक्तिशाली होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यावर भीम खूप शक्तिशाली झाला होता, त्याने देव लोकांवर हल्ला केला आणि देवांचा पराभव करून देव लोक ताब्यात घेतले. तेव्हा राजा सुदक्षिण याने तुरुंगात शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची पद्धतशीर पूजा सुरू केली, त्याच्या रोजच्या शिवपूजेने प्रेरित होऊन इतर कैदीही शिवाची पूजा करू लागले. रुंगात गेला. राजा सुदक्षिण कारागृहात शिवलिंगासमोर पूजा करत होता. भीमाने पार्थिव शिवलिंगावर तलवारीने हल्ला केला, त्याची तलवार शिवलिंगाला स्पर्शही करू शकली नाही आणि त्या शिवलिंगातून शिवजी प्रकट झाले. भगवान शिवाने नुसत्या गुंजारव करून भीमाला जाळून राख केले. भीमाच्या वधानंतर सर्व देवता आणि ऋषींनी भगवान भोलेनाथांना लोकांच्या कल्याणासाठी येथे कायमचा निवास करण्यास सांगितले. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी त्याच ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात भगवान शंकराची स्थापना झाली. हे शिवलिंग भीमेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने जगप्रसिद्ध झाले.

७. श्री विश्वेश्वर, वाराणसी, उत्तरप्रदेश – विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या पवित्र वाराणसीमध्ये विराजमान आहे. या ठिकाणाला धर्म नगरी काशी असेही म्हणतात जे भगवान भोले नाथांचे प्रिय मानले जाते. गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे. असे म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडले आणि काशीत कायमचे वास्तव्य केले.

८. श्री त्र्यंबकेश्वर, नाशिकजवळ, महाराष्ट्र – ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असणार्‍या नाशिकजवळ ‘त्र्यंंबकेश्‍वर’ हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावर ३ उंचवटे असून ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत. नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विधी येथे शीघ्र फलदायी होतात. येथे संत निवृत्तीनाथांची समाधी आहे. त्र्यंबकेश्‍वर देवालयाच्या गाभार्‍यात निर्माण होणार्‍या ऊर्जा, चैतन्य सहन करण्याची ताकद ज्यांच्या शरिरात आहे, त्याच माणसांना गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. याचे शास्त्रीय कारण असे की, ज्वालामुखीतून जसा ऊर्जेचा उद्रेक होतो आणि त्यातून गॅमा, अल्फा, क्ष किरण, तसेच इतर धन, ऋण या बारीक विद्युत कणांचा वर्षाव होतो, तसाच ज्योतिर्लिंगातून होतो. त्र्यंबकेश्‍वरला हे सारे असे घडते; म्हणूनच ‘आतापर्यंत काही वेळा तीन दिवस, सात दिवस हे त्र्यंबकेश्‍वराचे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे’, असे तेथील स्थानिक वयस्कर पुरोहितांनी सांगितले. त्र्यंबकेश्‍वर हे शिवयोगयुक्त प्राचीन शिवयोगात वर्णन केलेले तीर्थस्थळ आहे. येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश युक्त जललिंग आहे.

९. श्री वैद्यनाथ, परळी, बीड, महाराष्ट्र – परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे.  भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे. रावण लंके जवळ जाताना दिशेप्रमाने प्रवास क्रमवारी नुसार महाराष्ट्र तील परळी हेच मुख्य व खरे बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे,

१०. श्री नागेश्वर, द्वारका, गुजरात – सोमनाथ व्यतिरिक्त नागेश्वर ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे. बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले.

११. श्री रामेश्वर, सेतुबंध, कन्याकुमारीजवळ, तामिळनाडु – तामिळनाडूमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे, अशी आख्यायिका आहे की लंकेवर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले.

१२. श्री घृष्णेश्वर, वेरूळ, संभाजीनगर, महाराष्ट्र – घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगे भूमीच्या खाली आहेत. या शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते. शिव हा दांपत्यांचा देव ! ‘शक्त्यासहितः शंभुः ।’ असा आहे. शक्ती नसेल, तर शिवाचे शव होते. इतर देव एकटे असतात; म्हणून त्यांच्या मूर्तींत अल्प ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या देवळात थंडावा वाटतो, तर शिवाच्या देवालयात अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याने शक्ती जाणवते. शिव ही लयाची देवता आहे. त्यामुळे शिवाच्या जोडीला इतर देवतांची आवश्यकता नसते; म्हणून शिवाच्या देवळात इतर देवता नसतात. काही ठिकाणी देवळाच्या व्यवस्थापन समितीने भाविकांना एकाच वेळी विविध देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या हेतूने किंवा अन्य कारणास्तव शिवाच्या जोडीला अन्य देवतांची स्थापनाही शिवालयात केलेली आढळते. शिवाची पूजा ब्राह्मणाने मोडायची नसते, म्हणजे निर्माल्य काढायचे नसते; म्हणून शिवाच्या देवळात गुरव असतात आणि पार्वतीच्या देवळात भोपे असतात. शिवपिंडीवरील निर्माल्य काढत नाहीत. ब्राह्मण शिवपिंडीला वैदिक मंत्रांनी अभिषेक करतात; परंतु त्याच्या नैवेद्याचा स्वीकार मात्र करत नाहीत. पूजा करणारे ब्राह्मण पिंडदान विधीही करत नाहीत.

माहिती संदर्भ – इंटरनेट