Home Maharashtra विकास कामांमुळे भीमाशंकर ज्योतिर्लिंग ३ महिन्यांसाठी बंद

विकास कामांमुळे भीमाशंकर ज्योतिर्लिंग ३ महिन्यांसाठी बंद

7
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेले भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे सध्या विकास आराखड्यानुसार नवीन बांधकाम कामे सुरू करण्यात आली आहेत. या अंतर्गत मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण आणि विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे.

बांधकामाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यासाठी मंदिर प्रशासनाने १ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिर परिसरात भाविक व पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्रशासनाकडून कामांची वेळोवेळी पाहणी केली जाणार असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातील. भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.