Home Agriculture पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

32
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नागपूर, दि.23 : दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.