Home India राज ठाकरे (मनसे) भाजपसोबत जाण्याची शक्यता.

राज ठाकरे (मनसे) भाजपसोबत जाण्याची शक्यता.

8
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

Amit Shah यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्यासोबतची बैठक नुकतीच संपली असून, आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. आता त्या अंतिम टप्यात असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास अर्ध तास बैठ सुरू होती, विनोद तावडे आणि अमित ठाकरे हे सुद्धा बैठकी मध्ये उपस्थित होते.

नाशिक आणि दक्षिण मुंबई या लोकसभेच्या जागांवर चर्चा झाल्याचे समजत आहे. राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. राज ठाकरेंच्या समावेशाने महायुतीला नक्कीच फायदा होईल असं भाजपच्या अनेक नेत्यांकडून बोललं जातंय. एकूणच राज ठाकरे यांचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असा भाजपचा अंदाज आहे.