विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट कालावधीत होणार !

7

मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. यामध्‍ये सार्वजनिक सुट्ट्या वगळून १५ दिवस कामकाज चालणार आहे. ७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्‍या कामकाज सल्लागार समित्‍यांची बैठक झाली.

या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी ही घोषणा केली. या बैठकीला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांसह मंत्री उपस्‍थित होते.