News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

सध्या उन्हाळा सुरू असून, वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा, उष्माघात यांसारखे त्रास होऊ शकतात. अशा परिस्थितीत पुढील खबरदारी घेणे आवश्यक आहे:

पाणी आणि आहार:

1. तहान लागण्याची वाट न पाहता पुरेसे पाणी प्यावे. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी आणि बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

2. पाणी गटागट न पिता घोट-घोट प्यावे. उन्हातून आल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतरच पाणी प्यावे.

3. ताक, पन्हे, सरबत, वाळा किंवा गुलाब पाण्याचा आहारात समावेश करावा.

4. जास्त साखर असलेली पेये टाळावीत.

वस्त्र आणि बाहेरील वातावरण:

5. हलकी, सैलसर आणि शक्य असल्यास सुती कपडे परिधान करावेत.

6. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे.

7. उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी किंवा मोठा पांढरा रुमाल डोक्यावर बांधावा.

8. शक्य असल्यास सावलीत राहावे आणि ऊन टाळावे.

शरीराची काळजी:

9. अधिक उष्णता जाणवू नये म्हणून खिशात किंवा पर्समध्ये कांदा ठेवावा.

10. थकवा आणि घाम येण्याचे प्रमाण जास्त असल्याने व्यायाम कमी करावा.

11. अती जागरण टाळावे, कारण त्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते.

12. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घ्यावी.

वातावरण:

13. घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी शक्य असल्यास कूलर किंवा वायूशीतलीकरण यंत्राचा वापर करावा.

उन्हाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यासाठी या उपाययोजना नक्की अमलात आणा!

संकलन – टीम ठळक न्यूज