प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावणारा दिवस म्हणजे  ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करतात. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.

 आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय नेत्यांनी, क्रांतीवीरांनी अनेक लढे देऊन आपल्या प्राणांची बाजी लावून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केले. तरीही २६ जानेवारी १९५० रोजी आपण सार्वभौम झालो. म्हणून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो.

आपला भारत एक मोठा लोकशाही देश आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य किंवा देश आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून मा.पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते.

या कार्यक्रमात भारतातील  सर्व राज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते.

या दिवशी धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व असणाऱ्या लोकांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते.  आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली आणि लोकशाही देश म्हणून जागतिक पातळीवर आपला भारत देश स्थापित झाला. आजच्या काळात आपण स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या दडपशाही व गैरवर्तनाविरूद्ध आवाज उठवू शकतो केवळ आपल्या देशातील राज्यघटना व लोकशाही मुळेच.

म्हणूनच आपल्या देशात प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा हा राष्ट्रीय उत्सव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपल्या देशाची राज्यघटना आणि त्याचे लोकशाही स्वरूप केवळ काश्मीरपासून कन्याकुमारीशी जोडले गेले आहे. हा एक महत्त्वाचा दिवस आहे जेव्हा आपला देश जगाच्या नकाशावर लोकशाही देश म्हणून स्थापित झाला. हेच कारण आहे की हा दिवस संपूर्ण देशभरात खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते.

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक भारतीयाने देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे  प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उजळून निघते.

प्रजासत्ताक दिन साजरा करताना मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाच्या ध्वजाची म्हण्जेच्ज तिरंग्याची विक्री होते. शाळेतील मुलं हातात तिरंगा घेऊन शाळेत जातात, मोठ्या व्यक्ती गाड्यांवर तिरंगा लावतात, कपड्यांवर किंवा अंगावर राष्ट्रीय ध्वजाची प्रतिकृती किंवा चित्र लावतात आणि नंतर २६ जानेवारी झाल्यावर आपल्या ध्वजाची विटंबना होते, अपमान होतो. म्हणून प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्या ध्वजाचा वापर करावा. त्याचा कुठे अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.राष्ट्रध्वज फाटणार , चुरगळणार नाही तसेच कुठे कचऱ्यात किंवा जमिनीवर पडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. झेंड्याचा एक खेळणे किंवा शोभेची वस्तू म्हणून वापर करू नये. कारण राष्ट्रध्वज भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांचे बलिदान व राष्ट्रसन्मान यांचे प्रतिक आहे. राष्ट्रध्वजाचा अनादर होऊ नये हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

आनंदाने राष्ट्रीय सण साजरा करूया , देशाभिमान जागवूया.

सर्व भारतीयांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !      

  श्री. किर्तीराज घुगे, नाशिक.