News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

भारतात सर्व वाहनांवर हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. शोरूम मध्ये आपण नवीन गाडी घेताना आर टी ओ कडून हाय सिक्युरीटी नंबर प्लेट मिळते.

तर ही हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नेमकी कशी असते त्याविषयी माहिती आपण बघू. या हाय सिक्युरीटी नंबर प्लेट अल्युमिनियम धातूपासून बनवल्या जातात. त्यावर QR कोड प्रमाणे स्टिकर सारखा एक होलोग्राम लावलेला असतो. त्यात वाहणाविषयीची सर्व माहिती कोड केलेली असते.

तसेच प्रत्येक वाहनासाठी एक स्वतंत्र लेजरकोड त्या प्लेटवर कोरलेला असतो. तो सहजासहजी नष्ट किंवा काढता येत नाही. मुख्य म्हणजे ही प्लेट कुणी बदलण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न कुणीही करू शकत नाही कारण ही प्लेट एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही. तुटल्याशिवाय ती निघतही नाही. ह्यामुळे त्या प्लेटचा गैरवापर करता येत नाही.

वाहनाचा अपघात झाला तर ह्या नंबर प्लेटमुळे मालकाविषयी सर्व माहिती लगेच उपलब्ध होते. मोटार वाहन कायदा 1989 नियम 50 नुसार वाहनाला ही हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. वाहन नवीन असो की जुने प्रत्येकाला ही नंबर प्लेट सक्तीची आहे.