१ नोव्हेंबरपासून पुण्यातील उद्याने चालू करण्याच्या सूचना ! – महापौर मोहोळ

72

पुणे – कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्यामुळे अटी आणि शर्ती यांच्या आधारावर ७ मासापासून बंद असलेली उद्याने १ नोव्हेंबरपासून चालू करण्याच्या सूचना महापौर मोहोळ यांनी दिल्या आहेत. केंद्रीय पथकाने कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारी मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्य प्रकारे काळजी घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

Source – sanatanprabhat.org/marathi