‘भारतातील हवा घाणेरडी आहे’ असे म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकाच प्रदूषणात पहिल्या क्रमांकावर !

83

वॉशिंग्टन (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाने २०१९ मध्ये  ‘एमिशन गॅप’ अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार याआधी आणि आताही अमेरिकेत सर्वाधिक ‘ग्रीन हाऊस गॅस’चे (यात कार्बनडाय आक्साईड, नायट्रस आक्साईड, मिथेन आदी विषारी घटक असतात.) उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या प्रतिडोई उत्सर्जनाचा विचार केल्यास अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्सर्जनाविषयी दुसर्‍या क्रमांकावर आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका हा सर्वांत अल्प प्रमाणात कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया त्यांच्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाहीत. या ३ देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे’, असे म्हटले होते. हे पहाता अमेरिकेतच किती प्रदूषण आहे, हे स्पष्ट होते.

Source – sanatanprabhat.org/marathi