वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘ऑसिरिस रेक्स’ या अवकाशयानाने ‘बेन्नू’ या लघुग्रहावर यशस्वी अवतरण करत यांत्रिक हातांद्वारे त्याच्यावरील खडक आणि माती यांचे नमुने घेतले आहेत. ‘हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता वर्ष २०२३ पर्यंत पृथ्वीवर आणले जातील’, असे ‘नासा’ने म्हटले आहे. ‘बेन्नू’ लघुग्रह पृथ्वीपासून ३२ कोटी हून अधिक किलोमीटर अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.