चतुर्थीला श्री महालक्ष्मी देवीची ‘ओंकाररूपिणी’ रूपात पूजा !

105

कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) – चतुर्थीला कररवीरनिवासिनी तिच्या व्यापक स्वरूपात विराजमान आहे. चतुर्थीला करवीरनिवासिनीचे सहस्रनामस्तोत्र भक्तांसाठी उद्धृत होणार आहे. मार्कंडेय ऋषि आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनत्कुमारांनी सहस्रनामाचे विवेचन सांगितले आहे. यानुसार चतुर्थीला (२० ऑक्टोबर) या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘ओंकाररूपिणी’ स्वरूपातील पूजा बांधण्यात आली आहे.
ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्‍वर आणि मकरंद मुनीश्‍वर यांनी बांधली.

सकाळी जोतिबा देवस्थान येथे श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील आलंकारिक पाचपाकळी कमळपुष्पातील महापूजा बांधण्यात आली होती, तसेच चोपडाईदेवी, काळभैरव, यमाईदेवी, महादेव यांचीही महापूजा बांधण्यात आली आहे.