नाशिक – नाशिक शहर व जिल्हा आज सायंकाळच्या सुमारास विजा आणि पाउस यांनी झोडपून निघाला.  सुमारे 5 वाजेच्या सुमारास पाउसाला सुरवात झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून. शेतकरी राजा संकटात सापडला आहे. ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरी नागरिकांसह जिल्ह्याच्या अनेक भागातील रहिवाशांची धांदल उडाली. ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.