पोखरण (राजस्थान) – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) २२ ऑक्टोबरला सकाळी पावणे सात वाजता येथील सैन्यतळावर ‘नाग’ या रणागडाविरोधी क्षेपणास्त्राची घेतलेली अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो. भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. या यशस्वी चाचणीमुळे भारताला आता इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून अशा क्षमतेची क्षेपणास्त्रे आयात करण्याची आवश्यकता उरणार नाही.
ठळक बातम्या
जगात पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग
बीजिंग (चीन) – चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे....
आणखी वाचा
बिहार पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू
बिहार विधानसभा निवडणकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारच्या १६ राज्यांमधील ७१ जागांवर आज मतदान होत आहे. बिहारमध्ये प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध...