ओबीसी आरक्षणावर ही महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली आहे. त्यात सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
त्यामुळे ओबीसी समाजासाठी (OBC Reservation) हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. दोन महिन्यांपासून निवडणुका रखडल्या आहेत, त्यामुळे दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करा, असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. आगामी निवडणुक या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह होणार आहेत एवढं मात्र नक्की झालं आहे. बांठिया आयोगाने 27 टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस केली होती. ही शिफारस सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे.