क्युसेक (cusec), टीएमसी (tmc) पाण्याचे एकक म्हणजे काय?

24

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, टिव्ही, आकाशवाणी, सोशियल मीडिया अशा सर्वच ठिकाणी पावसाच्या, पूरपरिस्थिती, धरणे, बंधारे तुडुंब भरल्याच्या बातम्या येत असतात.

आपल्याला सर्वानाच माहिती आहे पाऊस हा मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा इंचा मध्ये मोजला जातो. तसेच पावसाळ्यात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा क्यूसेक ह्या परिमाणात मोजला जातो. त्याचप्रमाणे धरणातील पाणीसाठा टीएमसी मध्ये मोजतात. तर हे क्युसेक आणि टीएमसी म्हणजे काय? हा प्रश्न आपल्या सर्वानाच असतो.

१ टीएमसी पाणी म्हणजे – १ फूट x १ फूट x १ फूट = १ घनफूट पाणी होय.

१ घनफूट पाणी म्हणजे २८. ३१ लिटर पाणी साधारण २ बादल्या पाणी. यानुसार १ दशलक्ष घनफूट पाणी म्हणजे १ एमसीएफटी पाणी.

१००० दशलक्ष घनफूट पाणी म्हणजे १ टीएमसी पाणीसाठा होय. म्हणजेच १ अब्ज घनफूट पाणी.

धरणातून पाणी सोडताना ते क्युसेक या एककात मोजतात. १ घनफूट प्रति सेकंद म्हणजे १ क्यूबिक फूट पर सेकंद म्हणजेच क्युसेक.

म्हणजे जेव्हा धरणातून १००० क्युसेक पाणी सोडले जाते म्हणजे १००० x २८.३१ लिटर म्हणजेच २८३१० लिटर पाणी प्रति सेकंदाला सोडले जाते.

धरणातून ३०००० क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीची पाणी पातळी जिथे स्थिर होईल ती पांढरी पुर रेषा असते. याच्या दुप्पट म्हणजे ६०००० क्युसेक वेगाने पाणी सोडल्यावर नदी पात्राची पाणी पातळी जिथे पोहचेल तेव्हा निळी पूर रेषा आखली जाते. १ लाख क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर पाणी निळी रेषा ओलांडते तेव्हा लाल पूर रेषा आखली जाते.