शिवसेना-शिंदे गटाच्या वादावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

7

शिवसेनेच्या याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजूने 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र, कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.  युक्तिवादा दरम्यान एकनाथ शिंदे यांचे वकील हरीश साळवे यांनी काही कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला.

सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठाने या प्रकरणामध्ये बरेच कायदेशीर पेच आहे. त्यामुळे या प्रकरणावर मोठ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली पाहिजे, असं मत नमूद केलं आहे. तर, राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले होते. एकत्र लोकांकडे मत मागण्यासाठी गेले होते. मग आज पक्षातील दोन गट झाले तर त्याच गैर काय आहे, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला आहे.

प्रकरणासंदर्भात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तर पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होईल असं स्पष्ट केलं.