News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती, धर्म यापलीकडे देखील तुळस आरोग्यास लाभदायक आहे. आज जाणून घेऊ तुळशीचे आरोग्यदायी फायदे:

ताप

अनेक वेळा वातावरणात बदल झाला की काहींना लगेच ताप येतो. अशावेळी, तुळशीच्या पानांचा रस काढावा आणि 1-2 चमचे सेवन करावा त्यामुळे ताप उतरण्यास मदत होते.

सर्दी

सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने, सर्दी दूर होऊ शकते.

डोकेदुखी

अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या असल्यास, अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे डोकेदुखी कमी होते.