News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडन-हॅरीस प्रशासनासह भारत-अमेरिका संबंध नवीन उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.