पाकच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ११ मजूर ठार

5

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या उत्तरी वजीरिस्तानच्या गुलमीर कोट परिसरात १९ ऑगस्ट या दिवशी आतंकवाद्यांनी एका वाहनावर आक्रमण केले. या वेळी घडवलेल्या बाँबस्फोटात वाहनातील ११ मजूर ठार झाले, तर दोन जण घायाळ झाले. या आक्रमणाचे दायित्व अजूनपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

काही दिवसांपूर्वी पाकच्या बाजौरमध्ये चालू असलेल्या राजकीय सभेच्या वेळी आत्मघातकी स्फोट झाला होता. त्यात ६३ लोक मारले गेले होते. इस्लामिक स्टेटने त्या आक्रमणाचे दायित्व घेतले होते. पाकिस्तानी सैन्याने खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील खैबर जिल्ह्यात आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या गुप्त कारवाईमध्ये दोन आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात