वर्षाचे बाराही मास मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिणे चुकीचे.

19

मातीच्‍या मडक्‍यातील पाणी थंड गुणधर्माचे असते. उन्‍हाळा आणि पावसाळ्‍यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्‍टोबर मासातील गरमीचे दिवस) या काळात मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिणे आरोग्‍याला हितकारक असते;

परंतु पावसाळा, हिवाळा आणि हिवाळ्‍यानंतर येणारा वसंत ऋतू (फेब्रुवारी आणि मार्च) या काळात मातीच्‍या मडक्‍यातील पाणी प्‍यायल्‍याने शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) मंद होण्‍याची शक्‍यता असते.

यामुळे उन्‍हाळा आणि शरद ऋतू सोडून अन्‍य वेळी मातीच्‍या मडक्‍यातील पाणी पिऊ नये. या काळात स्‍टील किंवा कलई केलेले तांबे-पितळ यांच्‍या भांड्यातील पाणी प्‍यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा