ईडीचे संचालक संजय मिश्रा (ED Director Sanjay Mishra) यांचा कार्यकाळ वाढला, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला मोठा दिलासा

5

नवी दिल्ली- केंद्र सरकारला मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे संचालक संजय मिश्रा (ED Director Sanjay Mishra) यांचा कार्यकाळ वाढवला आहे. न्यायालयाने मिश्रा यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. ईडीचे संचालक संजय मिश्रा यांना ३१ जुलै ते १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा वाढवण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. मुदत वाढवण्याची केंद्र सरकारची मागणी मान्य करत न्यायालयाने 11 जुलैच्या आदेशात बदल केला आहे.

यासोबतच सुप्रीम कोर्टाने भविष्यात ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ वाढवण्याच्या कोणत्याही याचिकेत हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले.