धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी एक पांढरा दगड सापडला असून त्यावर कमळाचा आकार दिसून आला आहे. यानंतर हिंदु पक्षातील लोकांचा विश्वास वाढत आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाच्या निर्देशांनुसार भोजशाळेच्या आवारात हे उत्खनन चालू आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल ४ जुलैपर्यंत न्यायालयाला सादर करायचा आहे.
दक्षिण-पश्चिम दिशेला एका खड्ड्यातून गाळ काढला जात असतांना तेथे ३ फूट लांब तलवार सापडली, तसेच येथे २ खांबांची स्वच्छता करण्यात आल्यावर या खांबांवर देवतांच्या आकृती कोरलेल्या दिसल्या.