अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे दिवाळी निमित्त श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर सहस्रो दिवे लावण्यात येत आहेत. ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या काळात हा दीपोत्सव साजरा केला जात आहे. १३ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे उपस्थित रहाणार आहेत. या दीपोत्सवाला पंतप्रधान मोदी ‘व्हर्च्युअल’ म्हणजे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत. तसेच भाविकांनाही हा कार्यक्रम पहाता येणार आहे. यासाठी सरकारने एक पोर्टल बनवले आहे. १३ नोव्हेंबरला याचे उद्घाटन होणार आहे.
#Diwali2020 | With ‘festival of lights’ around the corner, the Uttar Pradesh govt is all set to launch a website for a virtual #Deepotsav for people to participate in #Ayodhya Deepotsav by lighting a virtual Diya. @Namita_TNIE https://t.co/iUyEuyTErL
— The New Indian Express (@NewIndianXpress) November 9, 2020
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, दीपोत्सवामध्ये राम की पौडी समवेत मठ, मंदिरे आणि घरे येथेही दिवे लावण्यात येत आहेत. राम की पौडी येथेच सुमारे साडेपाच लाख दिवे लावण्यात येणार आहेत. गत वर्षी झालेल्या दिवाळीत अयोध्येतील विविध घाट आणि आखाडांचा परिसर येथे ४ लाख १० सहस्र दिवे लावण्यात आले होते.