“ती” दीड वर्षीय चिमुरडी अखेर सापडली

78

नाशिक : सिव्हील हॉस्पीटलमधून अपहरण झालेली दीड वर्षीय चिमुरडी अखेर सापडली आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळच्या सुमारालागुन्हे शाखेच्या पथकाने सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालय समोरून अपहरणकर्त्यास ताब्यात घेत बालिकेची सुटका केली आहे. यावेळी पोलीसांच्या चौकशीत तसेच या अपहरणामागे सत्य समोर आले असून तसा खुलासा अपहरणकर्त्याने पोलीसांकडे केला आहे.

माणिक सुरेश काळे असं या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा फुलेनगर शनी मंदिर येथे राहणारा असून त्याने दोन दिवसांपूर्वी एका बलिकेचे अपहरण केले होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी माणिक काळेच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

मुलीचा मृत्यू झाल्यामुळे माणिक काळेवर दुखाचा डोंगर कोसळला होता. नैराश्याने घेरलेल्या माणिकला आपल्याला आता आधार कुणीच नाही, अशी भावना निर्माण झाली होती. आपल्याला कुणी तरी आधार मिळावे म्हणून माणिकने बालिकेला उचलून नेल्याचे सांगितले.

संदर्भ व अधिक माहिती – सकाळ