टोकीयो (जपान) – येथे ‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही करण्यात आली.

जपान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची भेट

‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची भेट

पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध जगासाठी महत्त्वाचे सूत्र आहे. मी याला केवळ अर्थव्यवस्था आणि राजकीय सूत्र मानत नाही, तर माझ्यासाठी ते मानवतेचे सूत्र आहे. या युद्धावर उपाय शोधण्यासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व आम्ही करू.