सेऊल (दक्षिण कोरिया) – येथे एका रोबोटने कामाचा अधिक ताण आल्याने आत्महत्या केली. या रोबोटने पायर्यांवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही आत्महत्या आहे कि नाही, याची चौकशी केली जाणार आहे. कामाच्या दबावामुळे रोबोटने आत्महत्या केल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.
आत्महत्या करणारा रोबोट नगरपालिकेसाठी काम करत होता. हा रोबोट गेल्या एक वर्षापासून गुमी शहरातील लोकांना प्रशासकीय कामात साहाय्य करत होता. काही दिवसांपूर्वी तो पायर्यांच्या खाली निष्क्रीय अवस्थेत सापडला होता. काही लोकांनी रोबोटला पायर्यांवरून खाली पडण्यापूर्वी इकडे तिकडे फिरतांना पाहिले होते.
पालिका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार रोबोटचे सुटे भाग (पार्ट) जमा करण्यात आले आहेत. ज्या आस्थापनाने त्याची निर्मिती केली होती, तिच्याकडून याचे विश्लेषण केले जाणार आहे.