बालासोर: डोळ्यांची पापणी लवते न लेवते तोच ड्रोन सारख्या पायलटरहित यानांना टिपणाऱ्या क्षेपणास्त्रांचे (QRSAM) भारताने परीक्षण केले. हे परीक्षण ओडिशाच्या बालासोर येथे केले गेले. परीक्षणादरम्यान या क्षेपणास्त्रांनी लक्ष्याला अचूकपणे टिपले. ओडिशाच्या आयटीआर चांदीपूर परीक्षण रेंज येथून दुपारी ३.५० वाजता हे परीक्षण केले गेले.
हे क्षेपणास्त्र सिंगल स्टेज सॉलिड प्रोपलेंट रॉकेट मोटरद्वारे संचलित आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व प्रणाली स्वदेशनिर्मित आहेत. बॅटरी मल्टिफंक्शन रडार, बॅटरी सर्व्हिल्न्स रडार, बॅटरी कमांड पोस्ट वेहिकल आणि मोबाइल लाँचर ही QRSAM मध्ये वापरण्यात आलेली सर्व उपकरणे भारतातच तयार करण्यात आली आहेत. आकाशात गतीमान असलेल्या लक्ष्यालाही अचूकपणे टिपण्याची या क्षेपणास्त्रात क्षमता आहे.
संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स