Home International News Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन पाचव्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष

Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन पाचव्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष

15
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

ठळकन्यूज व्हाटस्अप ग्रुप मध्ये क्लिक करून शामिल  व्हा  !

मॉस्को – व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सलग पाचव्यांना पुतिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. वर्ष १९९९ पासून रशियात पुतिन यांची सत्ता आहे. बोरिस येल्तसिन यांनी वर्ष १९९९ मध्ये पुतिन यांच्याकडे सत्तेची सूत्रे सोपवली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरलेले नाहीत. आता पुतिन पुढील ६ वर्षे रशियावर सत्ता गाजवणार आहेत.

७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात ३ प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली होती. तिघांनीही पुतिन यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा युक्रेनविरुद्ध विशेष सैन्य कारवाई करण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका करणे टाळले होते. या विजयामुळे पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर रहाण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा विक्रम मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या २०० वर्षात दीर्घकाळासाठी राष्ट्राध्यक्ष रहण्याचा विक्रम आता पुतिन यांच्या नावे झाला आहे. पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शने केली होती. ही निवडणूक निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती, असा आरोप अमेरिकेने केला आहे.