News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्‍तानच्‍या सागरी सीमेत गेल्‍यामुळे पाकिस्‍तानने पकडलेल्‍या महाराष्‍ट्रातील मासेमारांच्‍या (fishermen caught by Pakistan!) कुटुंबियांना दरमासाला ३०० रुपये आर्थिक साहाय्‍य करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे. २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. कुटुंब अर्थसाहाय्‍यासाठी पात्र आहे कि नाही ? यासाठी ग्रामपंचायत, तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला लागणार आहे. गुजरात शासनाकडून अशाप्रकारे अर्थसाहाय्‍य दिले जात आहे.