‘काही जण आहार नियंत्रणाच्‍या (डायटिंगच्‍या) नावाखाली केवळ कोशिंबिरी खाऊन राहतात. काही जण भात किंवा पोळी यांसारखे पिष्‍टमय पदार्थ अत्‍यंत अल्‍प आणि कोशिंबिरी (सॅलड) भरपूर प्रमाणात खातात. असे करणे चुकीचे आहे.

कोशिंबिरी जास्‍त प्रमाणात खाल्‍ल्‍यास शरिरातील अग्नी (पचनशक्‍ती) मंद होतो. आपल्‍या परंपरेनुसार जेवणाच्‍या ताटात जेवणार्‍याच्‍या डावीकडे वाढले जाणारे पदार्थ अल्‍प प्रमाणात किंवा तोंडी लावण्‍यापुरते खायचे असतात. लिंबू, मीठ, विविध चटण्‍या, कोशिंबिरी, लोणची हे पदार्थ ताटात डावीकडे वाढले जातात. त्‍यामुळे कोशिंबिरींचा अतिरेक टाळायला हवा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा