News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

जीवनात येणार्‍या व्यक्तीगत समस्यांच्या निवारणासाठी व्यावहारिक प्रयत्नांना उपासनेची जोड देण्यास हिंदु धर्मात सांगितले आहे. आरोग्य, विद्या, बळ, सौख्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी आणि व्याधी, पीडा, दुःख इत्यादींच्या नाशासाठी अनेक यज्ञ, मंत्र, यंत्रे, स्तोत्रे आदींचे विधान धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोषांच्या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्यास सांगितले जाते. या उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

आकाशात भ्रमण करणार्‍या तेजोगोलांमुळे आपल्याला काळ मोजता येतो. लौकिक दृष्टीने काळाचा अर्थ ‘अवधी’ असा असला, तरी फल-ज्योतिषशास्त्रात काळाचा ‘प्रारब्ध’ हा अर्थ अभिप्रेत आहे. प्रत्येक जीव त्याचे प्रारब्ध घेऊन जन्मतो. जिवाच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहस्थितीवरून त्याच्या प्रारब्धाचा बोध होतो. भारतीय ऋषींनी ग्रहांना केवळ भौतिक पदार्थ मानले नसून त्यांच्या ठायी असलेले ‘देवत्व’ जाणले. ‘देव’ म्हणजे जे प्रकाश (ऊर्जा) देतात ते. ग्रहांची स्थूल ऊर्जा म्हणजे त्यांची विद्युच्चुंबकीय शक्ती आणि सूक्ष्म ऊर्जा म्हणजे त्यांच्यात असलेले प्रधान तत्त्व (पृथ्वी, आप, तेज, वायू किंवा आकाश). ग्रहांची सूक्ष्म ऊर्जा जिवाच्या सूक्ष्मदेहावर (टीप) शुभाशुभ परिणाम करते. जिवाचा सूक्ष्मदेह त्याच्या स्थूलदेहाला प्रभावित करतो.

कोणतीही उपासना श्रद्धेने करणे आवश्यक असते. श्रद्धापूर्वक केलेल्या उपासनेत मन, बुद्धी आणि चित्त यांचा सहभाग असतो. त्यामुळे उपासनेचा परिणाम सूक्ष्मदेहात खोलवर होतो. एकाग्रतेने आणि नियमितपणे केलेल्या उपासनेमुळे सूक्ष्मदेहावर झालेला परिणाम हळू-हळू स्थूलदेहावर दिसायला लागतो, तसेच परिस्थितीतही पालट होतो.

सध्याच्या काळात मनुष्याच्या जीवनातील ६५ टक्के घटना प्रारब्धामुळे घडतात. सततचे आजारपण, दीर्घ मुदतीच्या व्याधी, कौटुंबिक कलह, शैक्षणिक अपयश, आर्थिक चणचण, वैवाहिक सौख्य न लाभणे, अपघाताचे प्रसंग येणे यांसारखे दुःखद प्रसंग प्रारब्धामुळे घडतात. अशा समस्यांच्या निवारणासाठी भौतिक (स्थूल) उपाय योजण्यास मर्यादा येते. अशा समस्यांच्या निवारणासाठी आधिदैविक आणि आध्यात्मिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक ठरते. आधिदैविक उपाय म्हणजे यज्ञ, मंत्रजप, नामजप आदी उपायांद्वारे आपल्यातील पंचतत्त्वांचे संतुलन साधून जीवन समृद्ध करणे. आध्यात्मिक उपाय म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे. आधिदैविक उपाय ही सकाम साधना असून आध्यात्मिक उपाय ही निष्काम साधना आहे. आध्यात्मिक साधनेमुळे जिवाच्या चित्तावरील संस्कार हळू-हळू लोप पावतात; ज्यामुळे सर्व दुःखांचे मूळच नाहीसे होते. त्यामुळे हिंदु धर्माने सांगितलेल्या जीवनपद्धतीत अध्यात्माला प्रधानता आहे.

सारांश, ‘ग्रह-उपासना’ हा आधिदैविक उपासनेचा एक प्रकार आहे. ग्रह-उपासनेद्वारे आपल्याला आवश्यक असलेली सूक्ष्म ऊर्जा मिळवता येते. प्रारब्धामुळे उद्भवलेल्या समस्यांवर केवळ भौतिक (स्थूल) उपायांवर अवलंबून न रहाता आधिदैविक आणि आध्यात्मिक उपायांची जोड देणे श्रेयस्कर आहे !’

संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ