नाशिक – ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या माध्यमातून विविध शहराला जोडणाऱ्या विविध सेवा सुरू करण्यात आल्या असून, नाशिक शहरातील पर्यटनाला व व्यापार उद्योगाला गती मिळणार असून नाशिकहून १ मेपासून दिल्ली विमानसेवा विविध शहरांना जोडणाऱ्या हॉपिंग फ्लाईटमुळे पर्यटनाला संधी मिळणार आहे.
अनेक वर्षांपासून बंद पडलेली नाशिक दिल्ली विमानसेवा इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून १ मेपासून सुरू करण्यात येणार असून सकाळी ६:५५ दिल्लीहून निघून नाशिकला ८:५० ला पोहोचणार आहे. नाशिकहून परतीचे उड्डाण ९:२० ला निघून दुपारी ११:१५ ला हे विमान दिल्लीला पोहोचणार आहे. दिल्लीच्या या विमानसेवेमुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात निश्चितच मोठा उपयोग होणार आहे.
येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याच पाठोपाठ आगामी दोन वर्षात सिंह कुंभमेळ्याच्या निमित्ताने पर्यटकांची होणारी गर्दी पाहता इंडिगो विमानसेवेने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असल्याचे चित्र आहे. १ एप्रिलपासून नाशिक येथून अन्य शहरांना जोडण्यासाठी हॉपिंग फ्लाईटची सुविधा इंडिगोने सुरु केली आहे. त्यामध्ये मंगळुरू, राजमुंद्री, यांचा समावेश असून बंगळुरू, अमृतसर, भुवनेश्वर, चेन्नई, चंदिगड, नवी दिल्ली, जयपूर, कोची, कोलकत्ता, जोधपूर, जयपूर, लखनऊ, प्रयागराज, तिरुअनंतपुरम, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम, रायपूर आदी शहरांना हॉपिंग फ्लाईटने जोडले जाणार आहे