देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी मतमोजणीनंतर लागला. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणीपूर या राज्यांत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरला, तर गोव्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. येथेही अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या साहाय्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे सुतोवाच भाजपकडून करण्यात आले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला असून येथे आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे देहलीनंतर पंजाबमध्ये प्रथमच आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.
उत्तराखंड –
पक्ष | आघाडी |
भाजप | ४८ |
काँग्रेस | १८ |
आप | ० |
बसप | २ |
इतर | २ |
पंजाब
एकूण जागा | काँग्रेस | आप | शिरोमणीअकाली दल | भाजप | इतर |
११७ | १८ | ९२ | ४ | २ | १ |
उत्तरप्रदेश –
पक्ष | आघाडी |
भाजप | २७० |
समाजवादी पक्ष | १२८ |
बहुजन समाज पक्ष | १ |
काँग्रेस | २ |
इतर | २ |
मणीपूर –
पक्ष | आघाडी |
भाजप | ३० |
काँग्रेस | ४ |
एन्पीएफ् | ६ |
एन्पीपी | ६ |
इतर | ११ |
गोवा –
पक्ष | आघाडी |
भाजप | २० |
काँग्रेस | १२ |
मगोप | २ |
आप | २ |
इतर | ४ |