रुद्राक्ष निर्मिती कथा, बेल का वाहतात यांची उत्तरे..

महाशिवरात्री या दि‍वशी भगवान शिव ज्या कालावधीत विश्रांती घेतात त्याला प्रदोष किंवा निषिद्धकाल म्हणतात. या काळात भगवान शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. पृथ्वीवर हा काळ सुमारे एक ते दीड तासाचा असतो. या काळात शिवाची उपासना केल्याने उपासकाला त्याचा पूर्ण लाभ मिळतो.


नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शिव मंदिरे


भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे.



महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिव-तत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिव-तत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिव-तत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही’. – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)


हा आहे रुद्राक्षाचा अर्थ आणि त्याच्या निर्मितीची कथा !

शिवपूजा करतांना गळ्यात रुद्राक्षांची माळ घालावी, असे शास्त्र सांगते. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे विशेषकरून रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात. रुद्राक्ष विश्वातील देवांच्या प्रकाशलहरींचे मानवाच्या शरिरातील नादलहरींत आणि नादलहरींचे प्रकाशलहरींत रूपांतर करतो. यामुळे देवांच्या लहरी मानव ग्रहण करू शकतो आणि मानवाच्या विचारांचे देवांच्या भाषेत रूपांतर होते.


महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !
दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
शिवपिंडीला अभिषेक करा.
पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.


महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.


आपणास माहित आहे का शिवाला त्रिदल बेल का वहातात ?

‘सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात.  बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.


source – sanatan sanstha website