वॉशिंग्टन (अमेरिका), 21 फेब्रुवारी 2025 – भारतीय वंशाचे कश्यप (काश) पटेल यांची अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (FBI) च्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. अमेरिकी सिनेटने ५१-४९ अशा अल्प बहुमताने त्यांना या पदासाठी मंजुरी दिली.
सिनेटमधील मतदान आणि राजकीय वाद
डेमोक्रॅटिक खासदारांसह दोन रिपब्लिकन खासदार – सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की – यांनी पटेल यांच्या नियुक्तीला विरोध केला.
डेमोक्रॅटिक पक्षातील काही नेत्यांना भीती आहे की, पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली काम करतील आणि राजकीय विरोधकांना लक्ष्य करतील.
कश्यप पटेल यांचा दृढ संकल्प
नियुक्तीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाले, “FBI जगभरातील प्रत्येक कोपर्यात अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहील. ही माझी स्पष्ट सूचना आहे. नागरिकांना पारदर्शी आणि जबाबदार FBI हवी आहे. गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्थेच्या राजकारणीकरणामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे. आम्ही अशी FBI उभारू, जिचा प्रत्येक अमेरिकीला अभिमान वाटेल.”