इस्रायलने पॅलेस्टाईन विरोधात केली युद्धाची घोषणा

4

गाजा येथील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले, या कृत्यामुळे इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली. इस्रायलच्या भूमीत मोठ्या संख्येने दहशतवादी शिरल्याने इस्रायलकडून देखील या हल्ल्याला उत्तर देण्यात आले.

शनिवारपासून गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले करण्यात येत आहे. युद्धाची घोषणा होताच अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. तर हमासने खासकरून दक्षिण आणि मध्य इस्रायलवर निशाणा साधला आहे. त्यांनी दक्षिण परिसरातील सैन्य कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल आणि हमासच्या युद्धादरम्यान भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात. आवश्यक काम असेल तरचं घराच्या बाहेर जावं. संवेदनशील भागात जाऊ नका. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिलेल्या सुचनांचे पालन करा. असं आवाहन भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे.

हेल्पलाइनसाठी परराष्ट्र मंत्रालयानं फोन नंबर +97235226748 आणि ई-मेल आयडी consl.telaviv@mea.gov.in हे जाहीर केला आहे.