News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

कोलकाता – अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे हा लैंगिक छळ आहे आणि ३५४ (ए) १ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे, असे कोलकाता उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपिठाने एका खटल्यात निर्णय देताना म्हटले. या प्रकरणात आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने म्हटले की, हा केवळ कोणत्याही महिला पोलीस कर्मचार्‍याचाच नव्हे, तर कोणत्याही महिलेचा लैंगिक छळ आहे.