कोरोनाचे संकट आणखी ८ महिने रहाणार, विरोबा देवस्थान येथील भविष्यवाणी

62

नगर – तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिद्ध बिरोबा देवस्थान येथे होईकचा (भविष्यवाणीचा) धार्मिक कार्यक्रम रविवार १ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. देवाचे भगत श्री. नामदेव भुसारे यांनी ‘होईक’ (भविष्यवाणी ) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटांचे सूतोवाच केले. यामध्ये त्यांनी कोरोना महामारीचे संकट आणखी ८ मास राहणार असल्याचे सांगितले. देशात मोठ्या चळवळीचे भविष्य सांगितले, तसेच युद्धाची शक्यताही वर्तवली आहे. या व्यतिरिक्त पाऊस, पिकांची हानी, ग्रहणाचा काल, कापूस, सोने, ज्वारी इत्यादींचा भाव यांविषयीही त्यांनी भाकीत सांगितले.

देवाचे भगत श्री. नामदेव भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी कथन करतांना सांगितले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पूर वहाणार म्हणजे युद्ध होणार, दिवाळीत ५ ते ७ दिवसांत आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. भुसारे यांनी मागील वर्षी सांगितलेले युद्ध, तसेच नैसर्गिक आणि रोगराई यांच्या संकटाचे भाकीत खरे ठरल्याने ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.