बॅंकिंग क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक सुधारणा, ग्राहकांच्या तक्रारी, बॅंकांचे अभिप्राय लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं लॉकर सुविधेबाबत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. या संदर्भातली अधिसूचना आज मुंबईत प्रसिद्ध करण्यात आली. नवे नियम १ जानेवारी २०२२ पासून नव्या तसंच आता अस्तित्वात असलेल्या दोन्ही लॉकरना हे नवे नियम लागू होतील.

नव्या निर्देशानुसार बॅंकांना आपल्याकडच्या रिकाम्या लॉकरची शाखानिहाय यादी तयार करावी लागेल. तसंच भारतीय बॅकिंग असोसिएशन ने तयार केलेल्या आदर्श लॉकर नीतिचा स्विकार करावा लागेल. आदर्श लॉकर नीतिनूसार अवैध आणि धोकादायक वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.