मुंबई – मुंबईत प्रतिदिन हृदयविकाराच्या झटक्यामुळे २६ जणांचा, तर कर्करोगामुळे प्रतिदिन २५ जणांचा मृत्यू होत आहे. मुंबईतील चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘कोणत्या विकारामुळे वर्ष २०२२ मध्ये किती मृत्यू झाले ?’ यासंदर्भातील माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागितली होती. त्याच्या उत्तरात ही माहिती उघड झाली आहे.

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अल्प चालणे, सकस आहार न घेणे, वाट्टेल त्या वेळी जेवणे, वातानुकूलित वाहनांतून प्रवास करणे अशी अनेक कारणे, तसेच पालटती जीवनशैली कारणीभूत असल्याचे आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे.

आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !