Indians Working Abroad Remit ₹10 Lakh Crore to India in 2023

विदेशात काम करणार्‍या भारतियांनी वर्ष २०२३ मध्ये १० लाख कोटी रुपये भारतात पाठवले. अशा प्रकारे पाठवण्यात आलेली जगातील ही सर्वोच्च रक्कम आहे, अशी माहिती जागतिक बँकेने दिली. भारतानंतर परदेशात कमावलेला पैसा देशात परत पाठवण्यात मेक्सिकोचा क्रमांक लागतो. मेक्सिकोतील अनिवासी लोकांनी परदेशातून त्यांच्या देशात ५ लाख कोटी रुपये पाठवले. यानंतर चीन ४ लाख कोटी रुपये, फिलिपाइन्स ३ लाख कोटी रुपयांसह चौथ्या, तर पाकिस्तान २ लाख २० सहस्र कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे.

वर्ष २०२२ मध्ये अनिवासी भारतियांनी ९ लाख २८ सहस्र कोटी रुपये भारतात पाठवले होते. त्याच वेळी पाकिस्तानी अनिवासींनी अडीच लाख कोटी रुपये पाठवले होते; मात्र वर्ष २०२३ मध्ये यात १२ टक्के घट झाली.

संयुक्त अरब अमिरातमधून ‘युपीए’द्वारे पाठवण्यात आले पैसे !

संयुक्त अरब अमिरातमध्ये युपीए (ऑनलाईन पैसे हस्तांतरण) व्यवस्था चालू झाल्यामुळे तेथे कामासाठी गेलेल्या भारतियांनी देशात त्याद्वारे पैसे पाठवले.

जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारतियांकडून सर्वाधिक पैसा अमेरिकेतून पाठवण्यात आला आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरातमधून पाठवण्यात आला.