देशभरात यंदा उन्हाळा अधिक तीव्र !

56

मुंबई – देशभरातील तापमान यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाच्या तापमानाच्या स्थितीवर आपल्या देशातील उन्हाळ्यातील तापमान अवलंबून असते. यंदा पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची स्थिती (म्हणजे ‘अल निनो’) निर्माण झाल्यावर तापमान ओसरण्याची (म्हणजे ‘ला निना’) स्थिती निर्माण होणार नसल्याने (म्हणजे ‘ला निना’ तटस्थ राहिल्याने) देशातील तापमान वाढणार आहे, असे हवामानतज्ञांनी सांगितले आहे.

कोकण, सह्याद्री घाट, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक रहाण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने १ मार्च या दिवशी वर्तवला. कमीतकमी सरासरी तापमान कोकण आणि सह्याद्री घाट येथे ६५ ते ७५ टक्के अधिक, उत्तर अन् पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भ येथे ३५ ते ६५ टक्के अधिक, तर विदर्भ आणि मराठवाडा येथे ३५ ते ५५ टक्के अधिक प्रमाणात वाढेल. अधिकाधिक सरासरी तापमान कोकण, सह्याद्री घाट आणि उत्तर महाराष्ट्र येथे ३५ ते ६५ टक्के अधिक, तर पश्चिम महाराष्ट्र अन् विदर्भ यांच्या काही भागांत ३५ ते ४५ टक्के अधिक राहील.