शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच – कर्नाटक उच्च न्यायालय

6

बंगळुरु – कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच, यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची टिप्पणीही केली आहे. त्याचबरोबर, शाळेतील विद्यार्थी शाळेचा गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नसल्याचेही उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे.

यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्यात आले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यांना विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.